
अमळनेर– शहरातील विद्या विहार कॉलनीतील रवींद्र मोतीराम पाटील यांच्या घराला असल्याने अचानक आग लागल्याची घटना घडली.

आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने कारवाई करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घरातील काही भागाचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
स्थानिक नागरिकांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.




