
इच्छुक उमेदवारांची उत्सुकता पोहचली शिगेला,
अमळनेर:-आगामी पालिका निवडणुकीसाठी राज्यातील नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण सोडत निघाल्यानंतर प्रभाग सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला असुन आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर नगरपरिषद कार्यालयात प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढली जाणार आहे.
यावेळी अनुसूचित जाती (महिला),अनुसूचित जमाती(महिला ),नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
असून 9 रोजी आरक्षण प्रसिद्ध केले जाणार असून 14 ऑक्टोबर पर्यंत दुपारी 3 पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत.तर 28 ऑक्टोबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.अशी माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली आहे.या सोडतीकडेही सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे.




