
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव व कळमसरे येथे पोलिसांनी धाडी टाकून देशी आणि विदेशी दारू विक्री करताना दोघांना पकडून त्यांच्याकडून एकूण ८ हजार ८०८ रुपये किमतीच्या ९१ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , उपनिरीक्षक विनोद पवार, उपनिरीक्षक संजय पाटील, भावेश देवरे, दीपक पाटील, संजय पाटील,हेमचंद्र साबे यांनी ५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता मारवड कळमसरे रस्त्यावर हॉटेल राधिका समोर जीवनलाल काशिनाथ सोनवणे हा देशी विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला त्याच्याजवळ ३ हजार ५१५ रुपयांच्या ४१ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तर ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:३० रोजी अमळगाव जळोद रस्त्यावर रामकृष्ण बुधा शिरसाठ (वय ५३) हा देशी विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला त्याच्याजवळून ५ हजार २९३ रुपयांच्या ५० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. असिफ मुशीर तडवी यांनी फिर्याद दिल्यावरून रामकृष्ण शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




