
अमळनेरसह नंदुरबार, शहादा व तळोदा येथील पदाधिकारीही करणार प्रवेश
अमळनेर:-येथील माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचा मंगळवार दिनांक 14 रोजी सायंकाळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असून अमळनेरसह नंदुरबार, शहादा व तळोदा येथील पदाधिकाऱ्यांसह आपण प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून माझी शिंदे गटात प्रवेशाची चर्चा होती. उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे साहेबाच्या ऑफिस मधून फोन आल्यानंतर मंगळवारी मुंबईत संध्याकाळी प्रवेश निश्चित झाला आहे.प्रत्यक्षात मी अमळनेर येथे मेळाव्याची मागणी केली होती,पण अतिवृष्टीमुळे अडचण, त्यामुळे आधी मुंबईत महत्वाचे पक्ष प्रवेश होऊन त्यानंतर अमळनेर येथे मेळावा घेऊन सर्वांचे प्रवेश होणार आहेत,यात अमळनेर सोबतच नंदुरबार,तळोदा व शहादा येथील माजी नगरसेवक, माजी सरपंच व इतर पदाधिकारीही प्रवेश करतील. पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, आ किशोर पाटील,आ अमोल पाटील यांच्या सहकार्याने हा प्रवेश होणार आहे. अमळनेरच्या विकासासाठीच आमचा प्रवेश होत असून येणाऱ्या निवडणूका आम्ही शिवसेना शिंदे गटाकडून लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा प्रवेश होत असला तरी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व नामदार गिरीश महाजन यांचेशी संबंध आहे तसेच राहतील, त्यांच्या पासून लांब जाणार नाही, निवडणूकीबाबत शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो मान्य राहील.महायुती बाबत वरून जे ठरेल तो निर्णय घेऊ.प्रवेशासाठी माजी आमदार साहेबराव पाटील सोबत आलेत तर आम्ही सोबत जाऊ.व प्रवेश झाल्यावर येत्या 15 ते 20 दिवसात विकासासंदर्भात गोड बातमी देऊ असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक प्रविण पाठक, सुनिल भामरे,महेंद्र महाजन यासह कार्यकर्ते उपस्थित होते.




