
अमळनेर:- शहरातील एलआयसी ऑफिसजवळ 40 ते 45 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला होता. सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
५ रोजी अमळनेर शहरातील जिलानी बाबा दर्गाच्या मागील बाजुस असलेल्या एल.आय.सी. ऑफिसजवळ, दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास वय अंदाजे 40 ते 45 वर्षाचा अनोळखी इसम मयत झाला होता. याप्रकरणी अमळनेर पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर मयताची अद्यापही ओळख पटली नसून मयताबाबत काहीही माहीती उपलब्ध झाल्यास पोहेकॉ विनोद भोई (मोबाईल क्रमांक 7304166148) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन अमळनेर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.




