
पतीच्या अनुभवाचा व सामाजिक कार्याचा होणार फायदा…
अमळनेर: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दहिवद गटातून मीनाताई भोजमल पाटील या महायुतीतर्फे इच्छुक असून दहिवद परिसरातील समर्थकांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
१३ रोजी निघालेल्या आरक्षणात दहिवद जिल्हा परिषद गट ना.मा.प्र. महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मीना भोजमल पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. त्यांचे पती भोजमल पाटील हे माजी पंचायत समिती सभापती तसेच सध्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे राबवण्यात आली असून, ग्रामविकासाचा ठोस पाया त्यांनी घातला आहे. त्याचा तालुक्याभरात मोठा जनसंपर्क असून मोठा गोतावळा त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा लाभ मीना पाटील यांना निश्चितच होणार आहे. मीनाताई पाटील यांचा शांत स्वभाव, प्रामाणिक कार्यशैली आणि पतीच्या कार्याची जोड, विद्यमान आमदार, खासदार व वरिष्ठ नेत्यांशी असलेला थेट संपर्क यामुळे ग्रामीण भागात त्यांना मोठा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.




