
अमळनेर :- मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान अंतर्गत तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खु. येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या वनराई बंधाऱ्यांमुळे हजारो लिटर पाणी अडवण्यात आले असून त्याचा फायदा भविष्यात गावाच्या पाणीटंचाई निवारणार्थ होणार आहे. हे अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या अभियानांतर्गत वनराई बंधाऱ्याचे कामाचे नियोजन गटविकास अधिकारी एन ए पाटील, विस्तार अधिकारी कटारे, सहाय्यक कृषि अधिकारी पूनम पाटील यांनी सहकार्य केले. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, जयवंतराव पाटील, सतिष पाटील, संतोष चौधरी, ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी यांनी श्रम घेतले.




