
अमळनेर : तालुक्यातील मुडी प्र. डा. पंचायत समिती गणातून इच्छुक म्हणून सौ सारिका गौरव पाटील यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा प्रभाव, तसेच कुटुंबाचा दीर्घ परंपरेचा वारसा यामुळे त्या मातब्बर आणि प्रभावी उमेदवार म्हणून पाहिल्या जात आहेत.

एमए बीएड शिक्षण झालेल्या सौ सारिका पाटील ह्या सामाजिक कार्यकर्ते गौरव उदय पाटील यांच्या पत्नी असून माजी जिल्हा परिषद सभापती उदय नारायण पाटील यांच्या स्नुषा आहेत. या कुटुंबाचा राजकारण आणि समाजकारणातील दीर्घ अनुभव सौ सारिका पाटील यांना मार्गदर्शन व बळ देणारा घटक ठरतो आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा अधिक जोमाने होत असून पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या संभाव्य उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून महिला वर्गातूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबाचे आमदार अनिल पाटील यांच्याशी जवळचे संबंध असून गण व गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांची भूमिका मोलाची असून वरिष्ठ नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
परिसरात विकासकामांची रोवली मुहूर्तमेढ…
सारिका पाटील यांचे सासरे उदय पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व ग्रामविकास शिक्षण मंडळाचे सलग २५ वर्षापासून चेअरमन आहेत. परिसरातील पाणंद रस्ते, गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, तलाठी कार्यालयाचे नूतनीकरण, गायत्री मंदिरासाठी सामाजिक सभागृहाची उभारणी, तसेच दळणवळणाच्या मुख्य रस्त्याची कामे अशी अनेक विकासकामे सामाजिक कार्यकर्ते गौरव पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून पूर्णत्वास नेत गावपरीसरात विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. आता हाच सामाजिक कार्याचा वारसा सौ सारिका पाटील मुडी पंस गणातून उमेदवारी करून पुढे नेणार आहेत.




