
अमळनेर:- तालुक्यातील ढेकू सीम येथील शेतातील विहिरीत २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
ढेकू सीम येथील रोहन उमेश पाटील (वय २५) हा तरुण १८ रोजी सकाळी ४ वाजेपासून घरात न दिसून आल्याने त्यांच्या भाऊ व नातेवाईकांनी गावात व शेतात शोध घेत असताना सकाळी ७:३० वाजता रोहनचे आजोबा देविदास भिका पाटील यांच्या शेतातील विहिरीत रोहनचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नातेवाईकांनी त्याचे प्रेत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून भावाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ काशीनाथ पाटील हे करीत आहेत.




