
अमळनेर:- तालुक्यातील निम येथे ५१ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० रोजी घडली आहे.
मंगल दत्तात्रय पाटील ( राहणार निम ) असे मयताचे नाव असून त्यांना बऱ्याच दिवसापासून अर्धांगवायू झालेला होता. २० रोजी दुपारी १:४० वाजेच्या सुमारास त्यांनी घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यांचा मुलगा आणि आजुबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्यांना खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. धीरज पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय संजय पाटील हे करीत आहेत.




