
अमळनेर:- तालुक्यातील मारवड पोलिस ठाण्यात २१ रोजी पोलीस स्मृती दिवस साजरा करण्यात आला.
दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो कारण या दिवशी 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंगमध्ये तैनात असलेल्या शूर सीआरपीएफ जवानांच्या छोट्या गस्तीवर चिनी सैन्याने हल्ला केला होता ज्यामध्ये 10 जवान शहीद झाले होते. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.
यावेळी एपीआय जिभाऊ पाटील यांनी या स्मृती दिनाचे महत्त्व विषद करत उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी शुरवीर पोलिस बांधवांना अभिवादन केले. यावेळी एपीआय जिभाऊ पाटील यांच्यासह सफौ फिरोज बागवान, सफौ संजय मकडू पाटील, पोहेकॉ धनंजय देसले, संजय पाटील, भरत गायकवाड, पोना मिलिंद बोरसे, पोकॉ हेमचंद्र साबे, मापोकॉ माधुरी शिरसाठ यांच्यासह पोलिस कर्मचारी, होमगार्ड व पोलिस पाटील बांधव उपस्थित होते.




