
अमळनेर:- तालुक्यातील गांधली व फाफोरे येथे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
तालुक्यातील गांधली येथे १९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास विजय आसाराम पाटील (वय ४५) याने राहत्या घराच्या बांधकाम सुरू असलेल्या वरच्या मजल्यावर वायरच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे त्याच्या पत्नीला दिसून आले. तिने आरडाओरड केल्याने मयताच्या भावाने व लोकांनी त्याला उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत फाफोरे बु. येथे लक्ष्मण पंडित शिंदे (वय ४०) याने २० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरी लोखंडी कडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. मयताचे काका आणि ग्रामस्थांनी त्यास उतरवून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.
दोन्ही प्रकरणात अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास अनुक्रमे हेकॉ गणेश पाटील व कैलास शिंदे हे करीत आहेत.




