
आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न..
अमळनेर:- शहरातील रामेश्वर नगर भागात श्री. रायरेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात येणार असून नुकतेच आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सदर मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
अमळनेर शहरातील श्री रायरेश्वर महादेव मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते मंगलमय वातावरणात २४ रोजी सकाळी संपन्न झाला. माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील व स्वप्नाताई विक्रांत पाटील यांच्याहस्ते महापूजा पार पडली. या प्रसंगी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाप्रसंगी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर उत्साही उपस्थिती होती.
“या मंदिराच्या उभारणीमुळे परिसरात नवचैतन्य, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश प्रसारित होईल,” असा दृढ विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, दादा पवार, रणजीत शिंदे, विनोद कदम, बाळू पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक महिला पुरुष, व तरुण मंडळी उपस्थित होती. परिसरातील तरुण मंडळींनी संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शेटे तर आभार मुकेश पाटील यांनी मानले.




