
अमळनेर : मोटरसायकलची बैलगाडीला धडक लागून मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना २४ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता घडली.ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील राहणार टाकरखेडा (वय २७) असे मयताचे नाव आहे.
टाकरखेडा पेट्रोल पंपाच्या पुढे ज्ञानेश्वर मोटरसायकल ने अमळनेर कडे जात असताना ही घटना घडली.डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्याचे शव विच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.त्यांच्या पश्चात आई भाऊ एक बहीण असा परिवार आहे.ऐन दिवाळीत तरुणाच्या निधनाने गावात शोक व्यक्त केला जात आहे.




