
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्याकडून दानशूर व्यक्तिमत्व डी आर पाटील (सेवानिवृत्त मंडळ अधिकारी) यांच्या सौजन्याने गरजूंना दिवाळीनिमित्त फराळ व साड्या वाट पाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गरजू महिलांना साड्या व मिठाई माजी सरपंच व सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. या कार्यक्रमाला माजी सरपंच भाऊसाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, गोकुळ पाटील, संतोष चौधरी, जयवंत पाटील व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते




