
अमळनेर– शनिवार पाठोपाठ रविवारी देखील अमळनेर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे वेचणीवर आलेला कापूस, मका तसेच चाऱ्याचे नुकसान होण्याची आहे. अजून दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा आला आहे. तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
तालुक्यातील पिंपळेसह परिसरात शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एक तास मध्यम स्वरूपाचा व नंतर पुन्हा तासभर तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे बळीराजाची चिंता वाढली. परिसरात गेल्या काही दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरण व ऊन – सावलीचा खेळ सुरू आहे. त्यात शनिवारी दुपारनंतर रात्री ४.०० वाजेपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणात मालाची आवक आल्या मुळे शेतकऱ्याची तारांबळ झाली. बाजार समित्यांमध्ये सुद्धा चांगलीच दाणादाण उडाली. शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्याकारणाने शेतकरी हा रब्बी हंगामाची तयारी व मुलींना व नातवंडांना दिवाळीनिमित्त काही भेट देण्यासाठी त्याच्या हातात पैसा नसल्याकारणाने आलेला शेतातून उत्पादन आलेले अत्यल्प भावाने व्यापाऱ्यांना देऊन निराशाने घरी जात आहे. मका काढण्यासाठी मजुरांचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याकारणाने सणासुदीला दोन दिवस साठी बाहेरगावाहून आलेले मुला मुलींना व नातूंना घेऊन शेतकरी आपल्या शेताचे काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच निसर्गाने मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.




