
अमळनेरः– तालुक्यातील धार, मारवड, मालपुर, रंजाणे, अंतुर्ली, खापरखेडे, अंबारे व पंचक्रोशी परिसरातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेले कापूस आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे.
एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पिकांना अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आधीच चिंतेत होता. त्यात या अवकाळी पावसाने त्यांच्या अर्थकारणावर मोठा आघात करून चिंता आणखी वाढवल्या आहेत. कापूस व मक्का पिकाचे भरपूर नुकसान झाले असून, ऐन काढणीच्या वेळेसच शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हरवला, अशी स्थिती झाली आहे. या संकटग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुकाध्यक्ष रविंद्र भगवान पाटील करत आहेत कापूस व मक्का पिकाचे भरपूर नुकसान झालेले आहे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, तसेच मागील रखडलेली भरपाई तत्काळ शेतकऱ्यांच्या तसेच त्यांनी नमूद केलेल्या महायुती सरकारच्या जीआरनुसार अमळनेर तालुक्यालाही तत्काळ मदत मिळावी, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, तसेच मागील रखडलेली भरपाई तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुकाध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी मान्य कृषी मंत्री यांना मेलद्वारे केली आहे.




