
अमळनेर:- शहरातील न्यू प्लॉट भागातून एक स्कुटी चोरीला गेली असून अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील प्रताप मिल कंपाऊंड भागात राहणारे अनिल अमृतकार हे गुळ बाजारात कामाला आहेत. १२ ऑक्टोबर रोजी ते आपले काम आटोपून सायंकाळी ६.३० वाजता न्यू प्लॉट भागात राहणारे त्यांचे चुलत बंधू स्वप्नील अमृतकार यांचेकडे सुझुकी कंपनीची ॲक्सिस १२५ स्कुटी ( एम एच ५४ अ ४३२८) या दुचाकीने भाजीपाला देण्यासाठी गेले.
घरात भाजीपाला देऊन थोड्याच वेळात ते बाहेर आले असता त्यांना घराबाहेर लावलेली दुचाकी दिसून आली नाही.शहरात इकडे तिकडे शोध घेऊन देखील दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल केली. हेकॉ. चंद्रकांत पाटील पुढील तपास करत आहेत.




