
अमळनेर : गेल्या पस्तीस वर्षांपासून दाराशी असलेला विजेचा खांब काढण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका कुटुंबाला गेल्या २० दिवसांपासून खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
विद्युत अभियंते ,कॉन्ट्रॅक्टर आणि वायरमन यांच्या दुर्लक्षामुळे गांधलीपुरा भागातील पारधी वाड्यातील शेख युनूस हकीम बेलदार हे व्यथित झाले आहेत. पस्तीस वर्षांपासून घराच्या दाराबाहेरच असलेला विजेचा खांब कुटुंबाला येण्याजाण्याला त्रास देत होता. त्यांच्या जीवाला धोका होता. तब्बल ३५ वर्षानंतर कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे व अभियंता हेमंत सैंदाणे यांनी तेथून विजेचा खांब हलवण्याला मंजुरी देऊन ते काम ठेकेदार बोंडे याना दिले. घरमालक युनूस शेखने खड्डे खोदून २० दिवस झाले तरी अजून काम करायला ठेकेदार आणि वायरमन आलेला नाही. हे खड्डे धोकेदायक झाले आहेत. यात नागरिक किंवा लहान मुले पडून दुखापत किंवा नुकसान झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्वरित खांब बसवण्याची मागणी शेख यांनी केली आहे.




