
अमळनेर : नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली झाली असून मुख्याधिकारी तुषार नेरकर याना ४ पासूनच कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील असे नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी आदेशात म्हटले आहे. राज्यातील ६५ मुख्याधिकारी , उपायुक्त यांच्या तात्पुरत्या पदोन्नती ने बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे मुख्याधिकारी आणि प्रशासक असे दोन्ही पदभार होते. अल्पावधीत तुषार नेरकर यांच्या काळात अनेक विकास कामे झालीत. त्यांचा कार्यकाळ अपूर्ण असताना त्यांची बदली करण्यात आली आहे.




