
अमळनेर : नियमांची ऐसी तैसी करणाऱ्या २२ जणांवर नाकाबंदीत कारवाई करून त्यांच्याकडून १९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , हेडकॉन्स्टेबल विलास बागुल , संजय बोरसे , विनय पाटील यांनी ६ रोजी सायंकाळी ७ ते ११ दरम्यान गलवाडे रस्त्यावर नाकाबंदी लावली होती. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी ,चारचाकी , मालवाहतूक गाड्या आदींची तपासणी केली जात होती. यात मोटरसायकलवर ट्रिपल शीट जाणे , वेग मर्यादा ओलांडणे , वाहन चालवताना मोबाईल वर बोलणे , लायसन्स नसणे , चारचाकीत शीट बेल्ट न लावणे आदी २२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे १९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.




