
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी ११ रोजी सदस्यपदासाठी १ अर्ज दाखल झाला असून आतापर्यंत सदस्य पदासाठी २ अर्ज दाखल झाले आहेत.ॲड. चेतना यज्ञेश्वर पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून ११ रोजी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी मात्र अजूनपर्यंत एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही.




