
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी १२ रोजी सदस्यपदासाठी ३ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत सदस्य पदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत.

प्रभाग क्रमांक १४ मधून निलेश महाजन, १५ मधून विनोद कदम तर १६ मधून विद्या भदाणे यांनी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीकडून अर्ज दाखल केले आहेत.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी मात्र अजूनपर्यंत एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही.




