
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथील ४२ वर्षीय इसमाने गोठ्यात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना ११ रोजी घडली आहे.

झाडी येथील मनोहर व्यंकट पाटील (वय ४२) याने ११ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यात गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यावेळी गावातील लोकांनी त्याला उतरवून खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवाड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस शिपाई संजय सूर्यवंशी करत आहे.




