
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी १३ रोजी सदस्यपदासाठी १९ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत सदस्य पदासाठी २४ अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी १३ रोजी २ अर्ज दाखल केले आहेत.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी अमळनेर शहर विकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २ अर्ज दाखल केले आहेत.
गुरुवारी सदस्य पदासाठी १३ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले,यात अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीकडून अफसाना खाटिक (प्रभाग -२),शोभाबाई गढरे(प्रभाग – ३),भरतकुमार ललवाणी (प्रभाग -३),हर्षल संदानशिव (प्रभाग – ६),रेखा पाटील(प्रभाग -७),प्रवीण गंगाराम पाटील(प्रभाग -७),विश्वास पाटील(प्रभाग – १४),राजेश पाटील (प्रभाग १६),विद्या भदाणे (प्रभाग १६) यांनी अर्ज दाखल केले.राष्ट्रवादी काँग्रेस कडून भरतकुमार ललवाणी (प्रभाग ३),रेखा पाटील (प्रभाग ७),राजेश पाटील (प्रभाग १६),विद्या भदाणे (प्रभाग १६ ) यांनी अर्ज दाखल केले तर शिवसेनेकडून कृष्ण बहारे (प्रभाग ३) यांनी अर्ज दाखल केले. अपक्ष म्हणून कल्पना शर्मा (प्रभाग -९), विश्वनाथ पाटील (प्रभाग १६), नीलिमा पाटील (अपक्ष १६), यांनी देखील अर्ज दाखल केले.




