
अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील फरशी रोड भागातून ६ रोजी मध्यरात्री ३० हजार किमतीची दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन जवळील फरशी रोड भागातील रहिवाशी दिनेश संदानशिव हे अमळनेर पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.५ रोजी रात्री १० वाजता ते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेले होते,रात्री १२.३० वाजता घरी आल्यावर त्यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल (एम एच १९ डी टी १०११) आपल्या राहत्या घरासमोर लावली.
सकाळी ६ वाजता उठल्यावर त्यांना त्यांची मोटारसायकल अंगणात दिसून आली नाही,त्यांनी इतरत्र शोध घेतला असता मोटारसायकल कुठेही दिसून न आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.पुढील तपास पोहेकॉ मिलिंद सोनार करत आहेत.




