
अमळनेर :- आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना अमळनेर सोलर असोसिएशनने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी सचिन साळुंखे, प्रवीण शिंपी, बापू महाजन, निलेश वाघ, नामदेव शेळके, रहीम पिंजारी, सागर पाटील, निलेश चव्हाण, हर्षल धनुरे व रावेश पाटील यांनी व्यक्तिगत भेट घेऊन निवेदन देत ठाकूर यांना पाठिंबा दर्शविला.
“जितेंद्र ठाकूर हे शहराच्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करणारे, प्रामाणिक आणि जनतेतून उभे राहिलेले उमेदवार आहेत. शहरातील सर्व घटकांचा विश्वास आणि पसंती त्यांना मिळत असून आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर तेच विराजमान होतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे” असे मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.




