
अमळनेर: तालुक्यातील फापोरे बु. येथील बहिरम बाबा यात्रोत्सवानिमित्त जीवन ज्योती ब्लड सेंटर व जीवनी श्री ब्लड सेंटर अमळनेर व धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत केलेल्या भव्य रक्तदान शिबीर मध्ये अनेक रक्त दात्यांनी रक्त दान केले.

रक्त दान हे श्रेष्ठदान आहे यांची प्रचिती शिबीरात दिसली तरी रक्त दात्यांना सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले व सदर शिबीरामध्ये २५ बॅक रक्त संकलन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ बाळासाहेब गव्हाणे, जनसंपर्क अधिकारी योगेश महाले, लॅब टेक्निशियन दिनेश पाटील, दिव्या सौदागर, प्रयोग शाळा सहाय्यक राजू जगताप तसेच गावातील जेष्ठ नागरिक व तरुण वर्ग यांनी परिश्रम घेतले व शिबीर यशस्वीरीत्या पार पाडले.




