
अमळनेर : बस मध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मणी असे २४ हजार रुपयांचे दागिने लांबवण्याची घटना २४ रोजी अमळनेर बसस्थानकावर घडली.

हर्षदा हेमंत भदाणे रा धांदरणे ता शिंदखेडा ही महिला दुपारी १ वाजता अमळनेर हुन चोपडा जाणाऱ्या बसमध्ये चढली. बस पुढे रवाना झाल्यावर महिलेला तिच्या गळ्यातील माळेचे काळे मणी पडताना दिसले तिने गळ्याला हात लावून पाहिले असता अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याचे दोन ग्राम मंगळसूत्र आणि दोन ग्राम वजनाचे दोन सोन्याचे मणी असे एकूण ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस नेल्याचे दिसून आले. बस पुन्हा अमळनेर बसस्थानकावर माघारी फिरून आणल्यावर शोधाशोध करूनही काही तपास लागला नाही म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.




