
अमळनेर : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात वास्तव्यास असलेल्या मात्र निवडणूक कामी कर्तव्य बजावत असल्याने नियुक्त मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान करता येणार नसलेल्या कर्मचारीवर्गासाठी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेचा कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत फायदा घेतला.

इंदिरा गांधी भवन येथे पार पडलेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेत एकूण १०४ कर्मचारी मतदान असून आज ५७ कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी निर्धारित वेळेत उपस्थित राहून मतदान केले.
या संदर्भात माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रुपेशकुमार सुराणा व गणेश शिंदे यांनी सांगितले की, “कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदानाधिकारापासून वंचित राहू नये म्हणून पोस्टल मतदानाची अंमलबजावणी करण्यात आली असून प्रक्रिया सुरळीत व नियमानुसार पार पडली.”
पोस्टल मतदान झाल्यानंतर सर्व मतपत्रिका सुरक्षिततेसाठी सील करून निवडणूक केंद्रात ठेवण्यातआल्या.




