
अमळनेर : दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या व त्रासदायक ठरणाऱ्या ४० जणांना २ डिसेंबर पर्यंत दोन वाजेपर्यंत शहरात बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.
नगरपालिका निवडणूक पारदर्शी व शांततेत पार पडावी म्हणून ज्यांच्या मुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ४० जणांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी भारतीय न्याय संहिता कलम १६३ प्रमाणे ३० नोव्हेबर पासून तर २ डिसेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत अमळनेर शहरात बंदी घातली असून त्यांना शहराबाहेर पाठवण्यात आले आहे. त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये म्हणून त्यांना २ रोजी दुपारी दोन नन्तर मतदान करण्यासाठी शहरात प्रवेश करता येणार आहे.




