
अमळनेर:-धावत्या रेल्वेतून भोरटेक रेल्वे स्थानक दरम्यान खाली पडल्याने एका 35 ते 37 वर्षा दरम्यान वय आलेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना 4 रोजी सकाळी 7 वाजेपुर्वी घडली.
अनोळखी पुरूष इसमाची उंची १७० से.मी.असून शरीर बांधा मध्यम, रंग- सावळा, केस काळे, कटींग केलेले, दाढी असलेला, चेहरा लांबट गोल, ‘दात पुढे आलेले दात पुर्ण, गुटखाने लालसर झालेले, उजव्या हाताचे मनगटावर मराठी भाषेत रोहीत, अमोल, रोहीत व इंग्रजी भाषेत S असे गोंदलेले, लाल व पिवळ्या रंगाचा दोरा बांधलेला, अंगात हिरव्या फिक्कट रंगाचे फुल बाहीचे शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅट, काळया रंगाची अंडरवियर परीधान केलेले व पायात काळया रंगाची चप्पल घातलेला, गळयात पांढऱ्या रंगाचा रूमाल, त्याच्या खिशातः विमल गुटखा पुडी, तंबाखु चुन्याची पुडी मिळुन आलेली आहे.सदर मयत हा रेल्वेने प्रवास करीत असतांना रात्री दरम्यान रेल्वेतुन खाली पडुन त्याचे डोक्यास मार लागुन गंभीर दुखापती होवुन मरण पावलेला आहे. याबाबत यातील खबर देणार यांनी दिलेल्या रेल्वे मेमो वरून अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू दाखल असुन पुढील तपास हेकॉ अशोक साळुंखे करीत आहेत.




