
अमळनेर (प्रतिनिधी): शहरातील जी.एस. हायस्कूलचे उपशिक्षक रोहित श्रावण तेले यांची साने गुरूजी माध्य. शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी, अमळनेर येथे संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे, पतपेढीचे अध्यक्ष सुशील भदाणे, संचालक मंडळ पदाधिकारी महेश नेरपगारे, सविता बोरसे, प्रा. मंदाकिनी भामरे, संजीव पाटील, संजय पाटील,महेंद्र पाटील, हिरालाल पाटील,आर.जे.पाटील, सेवानिवृत्त केद्रप्रमुख बन्सीलाल भागवत, तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलचे शिक्षक मुकेश पाटील, सेवानिवृत्त पर्यवेक्षक एस.सी. तेले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, रमेश देव, भाजप युवा मोर्चाचे देवा लांडगे, आनंद धनगर सर, खा.शी. मंडळ संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक बंधू–भगिनी उपस्थित होते जितेंद्र ठाकूर ,आर.बी.पाटील,महेंद्र रामोशे यांनी अभिनंदन केले,तसेच सर्व मित्रमंडळींनी रोहित तेले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.




