
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटर येथील अभ्यासिकेत भारतीय संविधानाचे शिल्पकार ,कायदे तज्ञ,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.दिनेश भलकार, प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर सी सरवदे, डॉ.बालाजी कांबळे, प्रा.हिमांशू गोसावी, प्रा.सागर सैंदाणे, प्रा.तुप्ती पटेल, प्रा.हेमांगी धर्माधिकारी, प्रा.अंकिता सावंत, प्रा.अतुल सपकाळे, दिलीप शिरसाठ, पराग रविंद्र पाटील, विशाल अहिरे, अतुल धनगर, चिंचोरे योगेश,चिंचोरे जयेश,नंदूसिंग पाटील, यांच्यासह सीसीएमसी विभागाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
जी एस हायस्कूल
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस.हायस्कूल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्हि.एम.पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने,मुख्य लिपीक जयश्री भालेराव,शिक्षक प्रतिनिधी आर. जे.पाटील,शिक्षकेतर प्रतिनिधी पंकज जैन,ज्येष्ठ शिक्षक के.पी.पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मंगरूळ हायस्कूल
मंगरूळ येथिल स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. प्रभुदास पाटील यांनी डॉ आंबेडकर यांचे कार्य विशद केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अशोक सूर्यवंशी , राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण , सीमा मोरे ,सीमा पाटील , राहुल पाटील , वस्ती शाळेचे भटू पाटील ,अहिरराव हजर होते.




