
अमळनेर:- शहरातील रेल्वे स्टेशनवर लावलेली व सुभाष चौक भागात दुकानासमोर लावलेली अशा दोन दुचाक्या चोरीला गेल्याची फिर्याद अमळनेर पोलिसांत देण्यात आली आहे.
दिनांक २० रोजी सकाळी ११ वाजता राहुल जितेंद्र चौधरी (वय २५, रा. भोईवाडा, अमळनेर) याने त्याची स्पेल्डर प्लस दुचाकी (क्रमांक एमएच १९ इजे ५४३९) ही सुभाष चौक भागात महावीर एम्पोरियम या कापड दुकानासमोर लावलेली होती. संध्याकाळी ६ वाजता तो गाडी काढायला गेला असता गाडी जागेवर दिसून आली नाही. शहरात इतरत्र शोध घेतला मात्र आजपावतो काहीच तपास न लागल्याने अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बु. येथील महेश यशवंत पाटील हे २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या लहान भावाच्या नावावर असलेली फॅशन प्रो गाडी (क्रमांक एमएच १८ एबी ६०८९) अमळनेर रेल्वे स्टेशनवर लावून शेगाव येथे गेले. २८ रोजी परत आल्यावर त्यांना पाहिले असता गाडी जागेवर दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्यांनी अमळनेर पोलिसात गाडी चोरीची तक्रार दिली आहे. पुढील तपास हेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहेत.




