
अमळनेर:- तालुक्यातील जळोद येथे २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील जळोद येथील पंकज पौलाद सोनवणे (धनगर) वय २५ याने राहत्या घरी मधल्या खोलीत गळफास घेतल्याचे लक्षात आल्याने गावातील लोकांच्या मदतीने त्यास खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या कानाने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संदेश पाटील हे करीत आहेत.




