
अमळनेर : पंढरपूर येथे चातुर्मास पूर्ण करून प.पू. प्रसाद महाराज यांची परतीची वारी सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी अमळनेरात दाखल होत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत खाटेश्वर महादेव मंदिर येथे महाराजांचे आगमन होणार असून वारीचे स्वागत करण्यासाठी परिसरातील शिष्य परिवार व भाविकांकडून मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली आहे.


यानंतर मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता अंबरिष ऋषी टेकडी येथे खिरापत व भजन कार्यक्रम पार पडणार आहे. भक्तिगीते, कीर्तन व नामस्मरणाच्या ध्वनीने परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
तसेच मार्गशीर्ष अमावस्या — शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी चातुर्मास सांगता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते ११.३० या वेळेत वाडीत देवा समोर भजन कार्यक्रम होणार असून त्यानंतर सांगता विधी पार पडणार आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे सद्गुरू सखाराम महाराज संस्थान, अमळनेर तर्फे आवाहन करण्यात आले आहे.





