
अमळनेर :- येथील वारकरी संप्रदायातील थोर संत, कीर्तनकार व समाजप्रबोधक संत सखाराम महाराज यांचे गादीपुरुष प.पू. गुरुवर्य प्रसाद महाराज यांची पंढरपूरहून परतीची वारीचे सोमवारी दि. १५ रोजी अमळनेरात भक्तिभावाच्या वातावरणात सकाळी ११ वाजता खाटेश्वर महादेव मंदिर येथे महाराजांचे आगमन झाले.
संत सखाराम महाराजांनी आयुष्यभर विठ्ठल नामाचा गजर करत भक्ती, सदाचार व मानवतेचा संदेश दिला. त्यांची वारी ही केवळ प्रवास नसून आध्यात्मिक परिपाक मानली जाते. प. पू. प्रसाद महाराज यांच्या वारीदरम्यान अभंग, हरिनाम, कीर्तन व प्रवचनांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला होता. ठिकठिकाणी वारकरी, भाविक व ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. परतीच्या वारीनिमित्त अमळनेर शहरात उत्साहाचे वातावरण होते.
खार्टेश्वर महादेव मंदिरात प.पू. प्रसाद महाराज पोहचल्यावर त्यांनी महादेव मंदिरात दर्शन घेतले. महादेव मंदिरात जितेंद्र ठाकुर यांनी सपत्नीक पुष्पहार घालून स्वागत केले.त्यानंतर वरणेश्वर महादेव, पंचमुखी महादेव यांचे दर्शन झाले. शहराच्या हद्दीवर नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी गणेश शिंदे, आमदार अनिल पाटील, जितेंद्र ठाकूर, विनोद लांबोळे, किरण कंडारे, संजय चौधरी,संजय पाटील,आदींनी महाराजांचे स्वागत केले. अनिता लांबोळे यांनी औक्षण केले.
यावेळी महेश कोठावदे, अनिल जोशी, केतन जोशी, मनोज देवकर, संजय पाटील,डॉ. चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, प्रताप साळी, अरुण बापु पाटील,सुनिल शिंपी, अभिजित भांडारकर, मनोज भांडारकर विनोद महाजन,प्रवीण पाठक, पंकज चौधरी, श्याम पाटील, नितीन भदाणे, झुलाल पाटील, किरण पाटील, संजय भिला पाटील, दिलीप भावसार,पांडुरंग भोई, रुपाली शिवदे यांनीही औक्षण केले. त्यावेळी मोठ्या संख्येने शिष्य परिवार व भाविक उपस्थित होते.
यानंतर समाधी मंदिरात पारंपरिक अभंग भजन म्हणतांना प.पू. प्रसाद महाराज यांनी संत सखाराम महाराज, बाळकृष्ण महाराज, प्रल्हाद महाराज व श्रीकृष्ण महाराज यांच्या समाधींचे दर्शन घेतले. वाडीत प्रवेश केल्यावर अभंग भजन म्हणत लालजींचे दर्शन झाल्यानंतर दिंडीची सांगता करण्यात आली. संपूर्ण सोहळा भक्तिभाव, शिस्त व उत्साहात पार पडला.




