
अमळनेर : प्रशासकीय सुधारणा तसेच लोक तक्रार विभाग कार्मिक आणि लोकतक्रार आणि पेन्शन मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने गुड गव्हर्नन्स विक (चांगल्या प्रशासनाचा आठवडा) अंतर्गत प्रशासन गावाकडे ही मोहीम १९ ते २४ डिसेंम्बर दरम्यान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतंर्गत २२ रोजी सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सर्व विभाग उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.




