
अमळनेर : दुकानांचे शटर व पत्रे उचकावून चार दुकानातील सुमारे ५४ हजार ५०० रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना १७ रोजी रात्री ते १८ रोजी पहाटे घडली.
अब्दुल अजीज मण्यार रा जळोद याचे अमळनेर शहरात गुरुनानक शॉपीमध्ये रिगल मोबाईल चे दुकान असून १८ रोजी पहाटे त्यांना मधुकर चौधरी यांचा फोन आला की तुमच्या दुकानाच्या शटर चे कुलूप तोडले आहे. त्याने दुकानात येऊन पाहिले असता त्यांना दुकानातील पैशांची पेटी व पैसे दिसले नाही. अज्ञात चोरट्यानी दुकानातील मोबाईल , ऍसेसरीज असे १७ हजारांचे साहित्य चोरी झाले. तसेच ३० हजार रुपये रोख चोरून नेल्याचे दिसले. तसेच सुरेश बठेजा यांचे दुर्गा टी डेपो देखील चोरट्यानी फोडले त्यातून सिगारेट पाकीटे व रोख २ हजार रुपये चोरून नेल्याचे समजले. तसेच मळीवाड्यातील भूषण भाईदास महाजन यांच्या दुकानातून जुनी बडोदा बँकेजवलील मयूर मोबाईल मधून ५ हजार ५०० रुपये किमतीचे मोबाईल साहित्य व मोबाईल असे साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले. त्याचसोबत सना इलेक्ट्रॉनिक्स ,गुरुकृपा एलकंट्रोनिक्स , पी जी टेलर्स आदी दुकाने देखील फुटली आहेत. अमळनेर पोलीस स्टेशनला ३३४(१), ३२५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , गणेश पाटील , प्रशांत पाटील ,उज्वल म्हस्के , विनोद संदानशीव ,उदय बोरसे यांनी भेट देऊन पंचनामे केले. दरम्यान चोरटा सिसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आला आहे. एलसीबी पोलीस देखील चौकशी साठी अमळनेरात आले आहेत. दरम्यान पोलीस अधिक तपास करीत आहेत.




