
अमळनेर – तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत पु. साने गुरुजींची 126 वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ जितेंद्र माळी यांनी केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून म. गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथील प्रा. डॉ. शैलेश वाघ तर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पवन पाटील हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. शैलेश वाघ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शैलेश वाघ यांनी कर्मयोगी साने गुरुजींच्या संस्कारक्षम विचारांचा वारसा सुरू ठेवून सामाजिक बदल कसा करता येईल यावर भाष्य केले.
तर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पवन पाटील यांनी आपल्या व्याख्यानात साने गुरुजींच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याची ओळख करून दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वसंत देसले यांनी साने गुरूजींनी केलेल्या कार्याचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महीला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




