
अमळनेर : नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांचा २२ चा आकडा गाठला असून दोन वेगवेगळ्या गटांची नोंदणी जिल्हाधिकऱ्यांकडे करण्यात आली आहे.
पहिल्या गटाच्या नेतेपदी पंकज चौधरी तर उपगटनेता म्हणून साहेबराव पवार आणि प्रतोदपदी नावेद शेख यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या गटात नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर , तसेच शिवसेनेचे नगरसेवक नावेद शेख , श्रीराम चौधरी , अपूर्वा चौधरी , कल्पना शर्मा , पंकज चौधरी , पुष्पा भोई , सुयोग धनगर , अनिल महाजन , साहेबराव पवार , इर्शाद तडवी तर शिरीष दादा मित्र परिवार आघाडी चे सविता संदानशिव , दीपक चौगुले तर अपक्ष कैलास पाटील , सुवर्णा हटकर , रुपाली शिवदे , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत निकम यांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या गटात कल्पना भरतसिंग परदेशी , छाया बाळू पाटील , स्वाती सुरजसिंग परदेशी , रामकृष्ण बापूराव पाटील , महेश प्रभाकर देशमुख , निलिमा विश्वनाथ पाटील यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहे. गटनेता म्हणून महेश देशमुख ,उपनेते म्हणून निलिमा पाटील आणि प्रतोद स्वाती परदेशी यांची निवड करण्यात आली.
दोन्ही गट माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात स्थापन झाल्याने नगरपरिषदेत पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे.




