
सातारा येथे ३ जानेवारी रोजी गझल कट्टा मंचावर धनगर करणार सादरीकरण…
अमळनेर:- सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी गझलकार शरद धनगर यांची निवड झाली आहे.
गझल कट्टा मंचावर खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष कवी गझलकार शरद धनगर यांना गझल सादरीकरणासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. तरन्नूम विशेष मुसायऱ्यात ते आपली गझल सादर करतील. दिनांक,३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हा मुशायरा संपन्न होणार आहे. शरद धनगर कवी गझलकार असून खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध संमेलनात ते निमंत्रित असतात. साहित्य अकादमीने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘साहित्योत्सव’ या राष्ट्रीय साहित्य महोत्सवात त्यांना अहिराणी कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या या निवडीबद्दल खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी व इतर मान्यवरांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.




