
अमळनेर :- तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा उदयनगर येथे बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी बालकांचा बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, खेळणी व खाद्यपदार्थांची रेलचेल यामुळे शाळा परिसर फुलून गेला होता.
या आनंद मेळाव्यास सरपंच प्रकाश वाघ, सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, सुदाम सोनवणे, माजी उपसरपंच सोनू पाटील, माजी सदस्य सतीश पाटील, योगेश पाटील, डॉ. जितेंद्र पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, सुभाष पाटील, सुधीर सोनवणे, ग्रामसेविका सोनी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश पाटील व त्यांची टीम यांच्यासह गावातील आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी, आजी-माजी विद्यार्थी व विविध क्षेत्रांत कार्यरत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी बालचमूंनी उभारलेल्या स्टॉल्सवर खाऊ खरेदी करून त्यांचा उत्साह वाढविला. सर्वच चिमुरड्यांना आनंदित करत हा बाल आनंद मेळावा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला. यावेळी सोनू पाटील यांनी जारच्या पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रविंद्र मासुळे यांनी केले, तर शेवटी नितीन शिंदे सरांनी आभार प्रदर्शन केले. खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात बाल आनंद मेळाव्याची सांगता झाली.




