
अमळनेर : येथील शिरूड नाका परिसरातील राजे शिवाजी मित्र मंडळ व जयहिंद व्यायाम शाळा आणि प्रताप आबा मित्रपरिवारातर्फे झोपडपट्टीत राहणारे ,उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांना थंडी पासून बचावासाठी मोफत ब्लॅंकेट वाटप केले.
माजी नगरसेवक प्रताप शिंपी , बबलू पाटील , जीवन पवार , गिरीश पाटील , रुपेश धोबी , सोनू पाटील , गणेश पाटील , सागर शिंपी ,सुरज शिंपी , पवन शिंपी यांनी गरिबांच्या वस्तीत जाऊन, उघड्यावर झोपणाऱ्या रेल्वे स्टेशन, बसस्थानक , गायत्री मंदिर आदी ठिकाणच्या उघड्यावर झोपणाऱ्या ४० नागरिकांना थंडी पासून बचावासाठी उबदार ब्लॅंकेट वाटप केले. त्यांच्या या कार्याने मायेची ऊब मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.




