
अमळनेर:- शिंदेखेडा तालुक्यातील पाष्टे येथील बेपत्ता इसमाचा तापी नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना २९ रोजी घडली आहे.
मयत श्रावण रामदास कोळी (वय ५५) हे शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे येथील असून २६ रोजी सकाळी ११ वाजता बाहेरगावी जातो असे सांगून घरातून निघाले होते. बराच वेळ होऊन ही ते घरी न परतल्याने नरडाणा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या मुलाने दाखल केली होती. २९ रोजी कपिलेश्वर येथील तापी नदी पात्रात त्याच वर्णनाचा इसम बुडाल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा मुलगा व गावातील नागरिक कपिलेश्वर येथे आले असता मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूला नदीपात्रात इसम तरंगताना दिसून आल्याने निम येथील काही जणांनी त्यास बाहेर काढले. ते श्रावण कोळी असल्याचे त्यांच्या मुलाने ओळखले व त्यांना घेऊन अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




