
अमळनेर:-शहरातील श्री मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी येत असताना ऍपे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात
दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना टाकरखेडा येथे घडली.
कानळदा येथील भाविक एपे रिक्षाद्वारे धरणगाव कडून अमळनेर कडे येत असताना टाकरखेडा जवळ अचानक टायर फुटल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.यात दोन जण किरकोळ जखमी झाले.सदर रिक्षा गोकुळ संतोष कोळी (राहणार कानडदा) यांच्या मालकीची होती.अमळनेर येथे मंगळ ग्रह दर्शनासाठी ते येत होते. गावकऱ्यांनी तातडीने मदत करून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढले.




