
अमळनेर :- तालुक्यातील शिरूड येथील एका २२ वर्षीय विवाहितेने घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अनिता अर्जुन भिल (वय २२ रा शिरूड ता.अमळनेर) हिने २९ रोजी रात्री छताच्या लाकडी खांब्याला सुती दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.तिच्या पश्चात पती, दोन वर्षांची मुलगी असा परिवार असून पोलीस पाटील विश्वास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




