
अमळनेर:- तालुक्यातील रढावण राजोरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेखाबाई अधिकार पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.
३० रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड पार पडली. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच भैयासाहेब वाल्मीक पाटील, ग्रामपंचायत अधिकारी अमिता राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य कमलाकर निंबा पाटील, तुकाराम मानसिंग सोनवणे, वैशाली समाधान पाटील, स्वाती पंकज पाटील, रजूबाई छोटु पाटील, दिपाली प्रविण अहिरे यांच्यासह कर्मचारी अजबराव पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




