
गांधली ग्रामस्थांचा विद्यार्थी व समाजहिताचा स्तुत्य निर्णय…
अमळनेर : तालुक्यातील गांधली गावात ग्रामविकास विचार मंचच्या वतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि कुटुंबासोबत वेळ घालवावा म्हणून संध्याकाळी साडेसात ते दहा या कालावधीत टीव्ही मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गांधली गावाच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयाने पालकांसाहित अनेकांनी स्वागत केले आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा तसेच घरातील व्यक्तींसोबत गप्पा चर्चा करून वेळ घालवावा जेणेकरून हे सोशल मीडियाच्या मृगजळापासून काही काळासाठी तरुण पिढी तसेच समाजातील सर्व घटक यांनी मुक्त व्हावे या उदात्तेतूने ही संकल्पना राबवण्याचे प्राचार्य डॉ. व्हि.आर. पाटील यांनी ठरवले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्याचे गांधली ग्रामविकास विचार मंचाच्या वतीने निश्चित करून गावात सायरन बसवण्यात आला. बालाजी विद्यालयचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजून देण्यात आली. या कामात मराठी शाळेला देखील अंतर्भूत करण्याचे ठरविण्यात आले मुख्याध्यापिका पाटील यासाठी तयार झाल्या आणि गावात स्टिकर लावण्यात येऊन या महिन्याची सुरुवात करण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे बि.डि.ओ. एन आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या प्रकल्पाच्या यश अपयशाचा विचार न करता जास्तीत जास्त सदस्यांनी अंमलबजावणी करावी जेणेकरून पुढे जाऊन ही संकल्पना एक सामाजिक चळवळ म्हणून पुढे यावी आज २५% विद्यार्थ्यांनी जरी याचा विचार केला तरी गावातील १०० विद्यार्थी म्हणजेच १०० घरांमध्ये ही संकल्पना राबवणे हे देखील मोठे यश होणार आहे. त्यामुळे न डगमगता सर्व शिक्षक वृंद गावातील समाज व विद्यार्थ्यांनी हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याने मेहनतीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आपल्या प्रस्ताविकात प्राध्यापक व्हि.आर. पाटील यांनी गावातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्यासाठी भविष्यात अभ्यास तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी यासंदर्भातील नियोजित उपक्रमांची माहिती दिली व यापुढे गांधली येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच प्रोजेक्टर द्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले प्रास्ताविक आशिष शिंदे यांनी केले. याप्रसंगी बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक काटे , मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पाटील ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद रामकृष्ण पाटील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व दोन्ही शाळांचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील यांनी गावात ग्रामविकास विचार मंच व शाळेने पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.




